नागपुरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी
नागपूर: शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक, व्यापारी, लघुउद्योजक व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, बाधितांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवेदनाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका नागपूर यांच्या कडे केली आहे.
निवेदन देते वेळी राज्य संघटक सागर डबरासे,शहर प्रमुख विक्रम राठोड पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,शहर संघटक किशोर पराते राजेश कनोजिया, उमेश निकम, सचिन कापसे, अनिल बोर्डे, किशोर ठाकरे, रोहित गौर, श्रीकांत खंडाळे, नरेश पांडे, सुखदेव ढोके आणि समस्त शिवसैनिक उपस्थित होते
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये जलसंचय होऊन घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि लघुउद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्यात भिजल्यामुळे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे तसेच व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल खराब झाला आहे.
या परिस्थितीला केवळ नैसर्गिक आपत्ती जबाबदार नसून, शहरातील अपुरी जलनिस्सारण व्यवस्था, नाल्यांची वेळेवर साफसफाई न होणे आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या :
पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व नागरिक व व्यापाऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक भरपाई जाहीर करावी.
लघु व मध्यम व्यावसायिकांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे.
शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन कृती आराखडा जाहीर करावा.
निवेदनात प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगर प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये जलसंचय होऊन घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि लघुउद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्यात भिजल्यामुळे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे तसेच व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल खराब झाला आहे.
या परिस्थितीला केवळ नैसर्गिक आपत्ती जबाबदार नसून, शहरातील अपुरी जलनिस्सारण व्यवस्था, नाल्यांची वेळेवर साफसफाई न होणे आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या :
पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व नागरिक व व्यापाऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक भरपाई जाहीर करावी.
लघु व मध्यम व्यावसायिकांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे.
शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन कृती आराखडा जाहीर करावा.
निवेदनात प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगर प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.