नागपूर -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनपा आयुक्त यांना सरकारची निष्काळजीपना आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या अलगर्जी विरोधात निवेदन देण्यात आले,

याप्रसंगी राज्य संघटक सागर डबरासे,पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,शहर संघटक किशोर पराते, शहर प्रमुख विक्रम राठोड, राजेश कनोजिया,उपशहर प्रमुख उमेश निकम सचिन कापसे,शंकर थुल,किशोर ठाकरे,अनिल बोर्डे,रोहित गौर, श्रीकांत खंडाळे, नरेश पांडे, सुखदेव ढोके सोबत सोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते,

निवेदनात म्हटले की सन भाजपा सत्तेत आल्यापासून राज्यातील अनेक शासकीय विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याची प्रथा जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे संबंधित कामासाठी मंजूर निधी, कामाचे स्वरूप, कालावधी, संबंधित विभाग, कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती नागरिकांना उपलब्ध होत नाही. परिणामी कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे आणि अनियमितता आढळल्यास तक्रार करू शकत नाहीत,
माहितीच्या अभावामुळे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
तसेच विविध शासकीय विभागांतील क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात नसल्यास ते “साईट पाहणीसाठी गेले आहेत” असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष उपस्थितीची खात्री करण्यासाठी कोणतीही पारदर्शक व्यवस्था नसल्यामुळे प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर प्रश्न निर्माण होतात कारण ते बहुतांश वेळी साईडच्या नावाने खाजगी कामासाठी बाहेरच असतात.
त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी वाढविण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावणे सक्तीचे करण्यात यावे. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी कार्यालयात दैनंदिन साईट व्हिजिट रजिस्टर ठेवणे अनिवार्य करण्यात यावे. त्यामध्ये अधिकारी कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेस पाहणीस गेले, भेटीचा उद्देश, परतण्याची वेळ व तपासणी अहवाल याची नोंद बंधनकारक करण्यात यावी अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईलअसा इशारा सुद्धा देण्यात आला.

