मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. इमारत रिकामी करण्यात आली असून बॉम्ब स्कॉडकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मेल करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनातील सर्वांना बाहेर काढण्यात आले असून गेटवर रोखण्यात आले आहे. बॉम्ब स्कॉडकडून परिसरात सर्च ऑपरेशन कऱण्यात येत आहेत. विधानभवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून पोलिसांकडूनही तपास कऱण्यात येत आहे. बॉम्बच्या अफवा विधानभवनात वाऱ्यासारखी पसरली असून सर्वांना गेटवर रोखण्यात आले आहे.
मुंबई मधील विधान भवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मंत्री, नेते विधानभवनात दाखल झालेले आहेत. त्यातच आज सकाळी अचानक धमकीचा मेल मिळाला, ही बातमी वाऱ्यासारखी विधानभवनात पसरली अन् एकच गदारोळ उडाला. सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनात बॉम्ब असल्याचा अधिकृत साईटवर धमकीचा मेल आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
बॉम्बच्या धमकीचा मेल मिळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ विधान भवनाकडे धाव घेतली. विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सर्वात आधी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सर्वांना गेटजवळ सुरक्षित ठिकाणी उभं कऱण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून इमारतीत तपासणी कऱण्यात आली. मुंबई पोलिसांचे विशेष पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) यांची सध्या विधानभवन परिसराची कसून तपासणी सुरु आहे.

