Oplus_16908288
बारामती (महाराष्ट्र): महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
विमान अपघातानंतर हादरवणारी परिस्थिती-
विमान अपघातानंतर ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहे. यामध्ये कुणाच्या हाताचा तुकडा, तर कुणाचा पायाचा तुकडा उडाल्याचे दिसले. तर विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते. अपघातानंतर आजूबाजूला राहणारे गावकरीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी अनेकांना परिस्थिती पाहून रडूही कोसळले.
अपघातग्रस्त विमान बोम्बार्डीयर कंपनीचं-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातग्रस्त विमान बोम्बार्डीयर कंपनीचं लिअरजेट 45 जातीचं विमान होतं. या जातीच्या विमानाचे आतापर्यंत जगभरात सहा अपघात झालेत. त्यातील चार अपघात जीवघेणे होते. दोन अपघातात विमान अनियंत्रित झालं होतं. अजितदादांच्या विमानातच्या अपघातातदेखील ते अनियंत्रितच झालं. हे कमाल ताशी 858 किमी वेगानं उडू शकणरं विमान आहे. ते 51 हजार फूट उंचीवरही उडू शकतं. य़ाआधी 2003 मध्ये सततच्य़ा बिघाडामुळे लिअरजेट 45 विमानाची उड़्डाणं बंद होती.
नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं-
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
विमानात कोण कोण होते?
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
आतापर्यंत अन्य कंपनीच्या विमान अपघातात फोटो मध्ये दाखविलेल्या नेत्यांचा मृत्यू झालेला आहे.


