नासिक:महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा आणि बड्या नेत्यांचे भविष्य वर्तवणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आह अटक फक्त एका गुन्ह्यापुरती मर्यादित नाही, तर यातून जे वास्तव समोर येतंय ते अंगावर काटा आणणारं आहे

काय आहे नेमकं प्रकरण?अत्याचाराचा आरोप: एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल झाला आहे.पेनड्राइव्हमध्ये ‘काळे’ कृत्य: तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या पेनड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.
राजकीय कनेक्शन: या भोंदू बाबाच्या दरबारात राज्यातील दिग्गज नेत्यांचा राबता होता. यामध्ये एकनाथ शिंदे, मंत्री दादा राधाकृष्ण विखे, दादा भुसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासारख्या बड्या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले!
विशेष म्हणजे, रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टमध्ये ‘विश्वस्त’ असल्याचंही बोललं जातंय. आता प्रश्न असा आहे की:
त्या ५८ व्हिडिओमध्ये नक्की कोणकोणते ‘पांढरपेशी’ चेहरे दडलेले आहेत?
भविष्य जाणून घेण्याच्या नादात हे नेते या भोंदूच्या जाळ्यात अडकले की आणखी काही?
जनतेसमोर नैतिकता शिकवणारे नेते आता यावर काय उत्तर देणार?
या प्रकरणाची पाळेमुळे खूप खोलवर असल्याचे दिसत आहेत.
इतर स्थानिक नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. हे महाराष्ट्राचं ‘एपस्टिन प्रकरण’ ठरणार का?
हे प्रकरण दाबले जाणार की सत्य बाहेर येणार?

